सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची भारतीय नौदलाच्या आयएनएस चेन्नई विनाशिकेवरून यशस्वी चाचणी

सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची भारतीय नौदलाच्या आयएनएस चेन्नई विनाशिकेवरून यशस्वी चाचणी

1 min read

नवी दिल्ली || सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची भारतीय नौदलाच्या स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधणी केलेल्या आयएनएस चेन्नई या विनाशिकेवरून अरबी समुद्रातील एका लक्ष्याचा भेद करीत यशस्वी चाचणी पार केली| या क्षेपणास्त्राने अत्यंत उच्च श्रेणीचे आणि अत्याधुनिक संचलन करत अचूकतेने लक्ष्याचा यशस्वी भेद केला|

प्रमुख मारक अस्त्राच्या रुपात जमिनीवरून लांब अंतरावरील लक्ष्याचा भेद करणाऱ्या क्षेपणास्त्राने नौदलाची क्षमता वाढवून युध्दनौकेची अजिंक्यता सुनिश्चित केली आहे| या बहुउपयोगी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची रचना, विकास आणि निर्मिती भारत आणि रशिया यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे|

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण संशोधन आणि विकास विभाग (DRDO), ब्रह्मोस आणि भारतीय नौदलाचे या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केले| डीडीआर अँड डी सचिव आणि डिआरडीओचे अध्यक्ष डॉ जी. सतीश रेड्डी यांनी डीआरडीओतील सर्व वैज्ञानिक, ब्रह्मोस, नौदल आणि उद्योगातील सर्वांचे या यशाबद्दल अभिनंदन केले| ते म्हणाले की ब्रह्मोस क्षेपणास्त्रे भारतीय सैन्यदलाचे सामर्थ्य अनेक पटींनी वाढवतील|

logo
The News Agency
www.thenewsagency.in